सिंगापुर – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापुरच्या दौऱ्यावर गेले असून आज त्यांचे तेथे आगमन झाले. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. या दौऱ्यात ते असियान देशांची अनौपचारीक बैठक आणि पुर्व अशिया परिषदेत सहभागी होतील. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांचीही ते या दौऱ्यात भेट घेणार आहेत.
मोदींचे आज सिंगापुरात आगमन झाले त्यावेळी तेथील भारतीयांनी पाऊस असतानाही आपल्या स्वागतासाठी गर्दी केली त्याबद्दल मोदींनी त्या नागरीकांचे आभार मानले आहेत असे पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने ट्विटर संदेशात नमूद करण्यात आले आहे. सिंगापुरला रवाना होण्यापुर्वी भारताची असियान संघटनेतील भागीदारी तसेच पुर्व अशिया परिषदेतील सहभाग याचे जोरदार समर्थन केले. परिषदेत सहभागी होणाऱ्या विविध देशांच्या प्रमुखांशीही मोदी भेट घेणार आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0