पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे साधणार महासंवाद 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकींना डोळ्यासमोर ठेऊन भाजप वेगवेगळे अभियान राबवित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपयोग प्रचारक म्हणून केला जात आहे. यानुसार पंतप्रधान आज कार्यकर्त्यांशी आणि काही नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महासंवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम पक्षातील सर्व १४,००० विभाग, ९८६ जिल्हे तसेच शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

भाजपचे सोशल मीडिया प्रभारी मनीष दीक्षित यांनी म्हंटले कि, महासंवादाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नरेंद्र मोदी अॅपसह फेसबुक पेज, ट्विटर आणि युट्युब चॅनल्सवर केले जाणार आहे. त्यांनी सांगितले कि, सर्व विभागांच्या कार्यकर्त्यांच्यासमेत प्रदेश अध्यक्ष डॉ. महेंद्र नाथ पांडेय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अमेठी मध्ये महासंवादात भाग घेतील. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखनऊमध्ये कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)