नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी काश्मीर प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. “पंतप्रधान मोदींनी काश्मीर प्रश्नावरून मध्यस्थीसाठी आपल्याकडे मदत मागितली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होतो”. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कोणीतीही मदत मागितली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
President Trump says PM Modi asked him to mediate between India & Pakistan on Kashmir!
If true, PM Modi has betrayed India’s interests & 1972 Shimla Agreement.
A weak Foreign Ministry denial won’t do. PM must tell the nation what transpired in the meeting between him & @POTUS
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2019