पंतप्रधान मोदींची रविवारपासून पुन्हा “मन की बात’

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून (दि. 30) पुन्हा एकदा “मन की बात’ कार्यक्रमातून जनसंवाद साधणार आहेत. याबाबत पंतप्रधानांनी नुकताच दुजोरा दिला आहे. या कार्यक्रमाचे दर महिन्यातील शेवटच्या रविवारी रेडिओवर थेट प्रेक्षपण होत असते.

लोकसभा निवडणूकीची 24 फेब्रवारीला आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात “मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले नव्हते. यानंतर लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित लोकशाही आघाडीने एकहाती सत्ता मिळविली. या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी 30 मे रोजी “मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, मोदी यांनी पहिल्या टर्ममध्ये 53 वेळा देशाला या कार्यक्रमातून संबोधित केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.