मनमोहन सिंग यांनी राफेल डीलवरुन मोदी सरकारला केलं लक्ष्य

इंदोर: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राफेल डीलवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच मोदींच्या काळात संसद, सीबीआय अशा महत्वाच्या घटनात्मक संस्थांचे पद्धतशीर खच्चीकरण आणि अवमुल्यन केले जात आहे. अशा शब्दांमध्ये माजी पंतप्रधानांनी मोदींवर जोरदार टीका केली.

मध्यप्रदेशातील निवडणूक प्रचारानिमीत्त त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले ‘देशवासीयांच्या मनात राफेल कराराबद्दल शंका आहेत. या कराराच्या चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे. मात्र मोदी सरकार यासाठी तयारी नाही. यावरुनच या व्यवहारात काहीतरी काळं असल्याचं समजून येतं.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)