न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचा मोठा निर्णय

न्यूझीलंड येथील क्राइस्टचर्च शहरामध्ये झालेल्या मशिदीवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध नोंदवण्यात येत असून न्यूझीलंड सरकार देखील या हल्ल्यानंतर खबरदारीची पावले उचलताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी न्यूझीलंडमधील शस्त्र कायद्यामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. आर्डर्न यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की न्यूझीलंडमध्ये आता सामान्य नागरिकांना सैन्य कारवाईसाठी वापरण्यात येणारी हत्यारे विकण्यावर बंदी लादण्यात येणार आहे. तसेच कोणताही मोठा हल्ला घडू शकेल अशी शस्त्रास्त्रे सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ नयेत, अशी हत्यारे तयार करण्यासाठी सामग्री मिळू नये यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)