वाजपेयी यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांचे नाणे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 100 रुपये किंमतीच्या एका स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अटलजी यापुढे आपल्यात नसणार यावर विश्वास ठेवण्यास मन तयार नाही. समाजातील सर्व वर्गांमध्ये ते प्रेमळ आणि आदरणीय होते.
त्यांनी सांगितले की, अनेक दशके, वाजपेयींचा आवाज हा लोकांच्या आवाजा सारखाच राहिला आहे. ते अद्वितीय वक्ता होते. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आमच्या राष्ट्राने निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट वक्तांपैकी ते एक होत.

“सदैव अटल’समाधीचे आज लोकार्पण
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी “सदैव अटल’ उद्या राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. वाजपेयी यांच्या निधनानंतर बांधण्यात आलेल्या या समाधीच्या बाजूच्या भिंतींवर अटलजींचे काव्य आणि गद्य उतारे कोरण्यात आले आहेत. नऊ चौकोन नवरस, नवरात्री आणि नवग्रहांचे प्रतिक आहे. या समाधीचा आकार कमळाचा असून समाधी बांधण्यासाठी देशाच्या विविध भागातून आणलेले दगड वापरण्यात आले आहेत अशी माहिती अटल स्मृती न्यास सोसायटीने दिली. सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने हे स्मारक उभारले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, वाजपेयी यांनी स्वतःच्या कारकिर्दीचा बराच काळ विरोधी पक्षांत व्यतीत केला असला तरीही त्यांनी सदैव राष्ट्रीय हिताचा विचार केला. वाजपेयी यांची लोकशाही सर्वोच्च रहावी अशी सदैव इच्छा होती. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, वाजपेयी आपल्या सर्वांसाठी सदैव एक प्रेरणा म्हणून कायम राहतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)