तृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती

तृणमूल काँग्रेसचे हत्या करण्यात आलेले आमदार सत्यजित बिस्वास

कृष्णानगर : ९ फेब्रुवारी रोजी तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिस्वास यांची गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. सत्यजित बिस्वास यांच्या खुनानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिजित पुंडारी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. बिस्वास यांच्या खूनप्रकारणानंतर पश्चिम बंगाल पोलीस पुंडारीच्या मागावर होते मात्र तो पोलिसांच्या हाती लागत न्हवता.

मात्र आज पोलिसांना अभिजित पुंडारी हा राधामोहनपूर रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी राधामोहनपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून पुंडारी याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत ५ लोकांना अटक केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)