सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे “प्राथमिक शिक्षण’ अतिरिक्त कार्यभार

पुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार विद्या प्राधिकरणातील प्रशासनीक अधिकारी सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्य शासनाकडून कुऱ्हाडे यांना ही जबाबदारी देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

तत्कालीन शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्या बदलीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाचे गणेश मोरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला. कालांतराने निरंतरचे हरुण अत्तार यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कामाचा आवाका लक्षात घेता याठिकाणी पूर्णवेळ शिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे. परंतु, दराडे यांच्या बदलीनंतर राज्य शासनाकडून शिक्षणाधिकारी पदावर कायमस्वरुपी नेमणूक करण्यात आली नाही. दरम्यान, मंगळवारी (दि.31) विद्या प्राधिकरणातील प्रशासनीक अधिकारी सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)