इम्फाळ : केंद्र सरकारने सादर केलेल्या नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात मणिपुरमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून त्यावरून ठिकठिकाणी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पुर्व इम्फाळ आणि पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
राजधानी इम्फाळ मध्येही हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून हे विधेयक आज मंगळवारी राज्यसभेत सादर केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने त्यावरून मोठी निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत. ते अनिश्चीत काळासाठी लागू करण्यात आले आहेत. मोबाईल इंटनेट सेवाही अनिश्चीत काळासाठी बंद करण्यात आली आहे. मंत्री, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0