महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद; राधाकृष्ण विखे पाटलांची मात्र अनुपस्थिती

राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी

महाआघाडीच्या संयुक्त बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती दिसली. तसेच पत्रकार परिषदेआधी झालेल्या बैठकीतसुध्दा विखे पाटील अनुपस्थित होते. यावरून विखे पाटील यांची नाराजी कायम असल्याचे दिसत आहे. विखे पाटलांच्या अनुउपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई – भाजप साम दाम दंड भेदाचं राजकारण करत आहे. त्याला काही पक्ष बळी पडत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी , शेकापचे जयंत पाटील यांच्यासह महाआघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी महाआघाडीत लोकसभेच्या 48 जागापैकी काँग्रेसला 24 , राष्ट्रवादीला 20 , बहुजन विकास आघाडी 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2 आणि युवा स्वाभिमानी पक्ष 1 जागा देण्यात आल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. महाआघाडातील घटक पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि इतर काही पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 जण आहेत.

जातीयवादी पक्षांना दूर सारा आणि युतीचा पराभव करायचा असेल तर मतभेद विसरा, असं आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं. तसेच काही पक्ष महाआघाडीत सामील झाले नाहीत, ते भाजपाची ‘बी’ टीम म्हणून काम करतं आहे, अशी टीका त्यांनी महाआघाडीत सामील न झालेल्या पक्षावर केली.

भाजपानं विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी यांची फसवणूक केली. कमळाचं बीज समूळ नष्ट करायचं आहे, असं राजु शेट्टी यावेळी म्हणाले. तसेच भाजपानं संविधान धोक्यात आणलं अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1109429671744208897

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)