राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळ येथील परिस्थितीचा आढावा घेतला

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळ येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी केरळचे राज्यपाल आणि  मुख्यामंत्री यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तेथील नेसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या स्थितीला गंभीर म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी तेथील नागरिकांना संपूर्ण भारत तुमच्या सोबत आहे, असे देखील सांगितले आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार या आपत्तीच्या वेळी केरळच्या मदतीला उतरल्याने राष्ट्रपती कोविंद यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी एनडीआरएफ आणि तेथील स्थानीक बचावकार्य करणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांची देखील प्रशंसा केली.

केरळमधील अतिवृष्टीने स्थिती खूप बिघडली असून बहुतांश नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे केरळ राज्याचा मोठा भाग पाण्याखाली आला आहे. तेथे एनडीआरएफ,  भारतीय सेना आणि अन्य काही स्थानिक संस्था बचावकार्य करीत आहेत. भारतीय सेनेने हेलिकॉप्टर आणि बोटी तेथे बचावकार्यासाठी उतरविल्या आहेत.  केरळमध्ये अजूनही हाय अलर्ट आहे आणि  हवामान खात्याने अतिवृष्टीचा  इशारा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)