राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून केरळ दौऱ्यावर

तिरूअनंतपुरम – राष्ट्रपती रामनाथ कोविंद तीन दिवस केरळ दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रपती उद्या केरळमध्ये पोहचतील. सरकारी सुत्रांनी सांगितले की, यादरम्यान 6 तारखेला केरळ विधानसभेच्या हीरक महोत्सवाच्या ‘लोकतंत्र के त्यौहार’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

तसेच विधानसभा परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल पी सदाशिवन, मुख्यमंत्री पिनराई विजयन, विधानसभा अध्यक्ष पी श्रीरामकृष्णन आणि विधानसभेचे विपक्ष नेते रमेश चेनिथल्ला हे या कार्यक्रमात सामिल होण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सूत्रांनूसार 7 आॅगस्टला राष्ट्रपती त्रिसूर मधील संत थाॅमस काॅलेजच्या ‘शताब्दी’ समारोहाचे उद्घाटन करणार आहेत आणि यानंतर ते दिल्लीला परतणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती गुरूवायूरमधील कृष्ण मंदिरात सुध्दा जाण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)