राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018 : विराट कोहली आणि मीराबाई यांना खेलरत्न

नवी दिल्ली  – भारतामध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची  घोषणा 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. दरवर्षी हे पुरस्कार 29 आॅगस्ट रोजी म्हणजेच क्रीडा दिन दिवशी दिले जातात. मात्र आशियाई स्पर्धेमुळे पुरस्काराची घोषणा आशियाई स्पर्धा संपल्यानंतर करण्यात आली होती.

आज (25 सप्टेंबर 2018 रोजी)  दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचा कर्णधार विराट कोहली याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू हिला सुध्दा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सतीश कुमार (बाॅक्सिंग) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

सतीश कुमार (बाॅक्सिंग) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

हिमा दास  (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

हिमा दास (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

जिन्सन जॉनसन  (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

जिन्सन जॉनसन (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

असे आहे पुरस्काराचे स्वरुप 

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे. तर अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)