राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते “कलर्स टू एअर’ सन्मान प्रदान

गोवाहटी: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज आसामच्या गुवाहाटी येथे हवाई संरक्षण महाविद्यालयात “स्टॅन्डर्डस्‌ ऑफ 118 हॅलिकॉप्टर युनिट’ आणि “कलर्स टू एअर’ सन्मान प्रदान करण्यात आले.

सध्या जग भारताकडे एक महत्वाची सत्ता म्हणून बघत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यापार आणि पर्यावरण संरक्षणसारख्या विषयांमधे भारताने महत्वाची भूमिका निभावावी अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले. जागतिक पटलावर भारताचा होत असलेला उदय अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. यात भारतीय लष्करी दलांची क्षमता आणि पराक्रम याचे महत्वाचे स्थान आहे. हवाई दल हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)