नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (ता.22) ऐतिहासिक कामगिरी करत ‘चांद्रयान-2’चे यशस्वी प्रक्षेपण केले. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून ‘चांद्रयान-2’ने अवकाशात झेप घेतली. यांनतर देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही इस्रोचे अभिनंदन केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘चांद्रयान-2’ चे ऐतिहासिक प्रक्षेपण हा प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा गर्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबदल त्यांनी इस्रोतील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले आहे. तसेच इस्रोला पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीहरिकोटा से चन्द्रयान-2 का ऐतिहासिक प्रक्षेपण हर भारतीय के लिए एक गर्व का क्षण है। भारत के स्वदेशी अंतरिक्ष कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए @ISRO के सभी वैज्ञानिकों और इंजीनियरों को बधाई। मेरी कामना है कि टेक्नॉलॉजी के नए-नए क्षेत्रों में ‘इसरो’, नित नई ऊंचाइयों तक पहुंचे।
— President of India (@rashtrapatibhvn) July 22, 2019
चांद्रयान-2 हे पहिलेच यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अतिशय जवळ 50 दिवसांनी उतरेल. या मोहिमेतून नाविन्याचा शोध आणि आपल्या ज्ञान प्रणालीमध्ये भर पडणार आहे. माझ्याकडून चांद्रयान-2 च्या टीमला शुभेच्छा, असे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
चंद्रयान-2 अब से लगभग 50 दिनों में चंद्रमा के दक्षिणी ध्रुव के करीब उतरने वाला पहला अंतरिक्ष-यान होगा। आशा है यह मिशन नई खोजों को जन्म देगा और हमारी ज्ञान प्रणालियों को समृद्ध करेगा। मैं चंद्रयान-2 टीम की सफलता की कामना करता हूँ — राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) July 22, 2019