नवी दिल्ली: संविधान दिनानिमीत्त येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी कोर्टाच्या सुनावणीच्या प्रक्रियेला जो विलंब होंतो व तेथे सारख्या पुढील तारखा पडण्याचे प्रकार होतात त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की संसदेत वारंवार होंणाऱ्या गदारोळामुळे आणि कोर्टाच्या सुनावणीतील विलंबांमुळे देशातील गरीबांना गैरसोय सहन करावी लागत असून ही चिंताजनक बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की आपल्या घटनेने न्याय पालिका, कायदेमंडळ आणि प्रशासन व्यवस्थेलां वेगवेगळ्या चौकटीत आधिकार दिले आहेत.लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या या तिन्ही घटकांनी घटनेचे पालन करीत लोकांच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्याचे काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की संसदेत लोकांच्या प्रश्नांची तड लागते पण तेथील कामकाजात गदारोळामुळे वारंवार खंड पडतो. तसेच कोर्टाचे कामकाजही वारंवार तहकुब होते त्यामुळे गरीबांना न्याय मिळण्यास विलंब होतो हे प्रकार टाळण्याची गरज आहे. न्यायदानाची प्रकिया गुणवत्तापुर्ण पद्धतीने तसेच वेगवान पद्धतीने होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे आणि न्यायपालिकांनीच त्यावर मार्ग काढावा असे आवाहन त्यांनी केले. देशातल्या सर्वच नागरीकांना त्वेरेने, सहज आणि कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. देशाला मिळालेली घटना ही अमुल्य असून लोकच या घटनेचे विश्वस्त आहेत असेही त्यांनी नमूद केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा