शाहू समाधी स्थळाचे 70 लाखाची एस्टिमेट दोन दिवसात सादर करा : महापौर सरीता मोरे

कोल्हापूर: महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग या जागेत विकसीत करण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या कामाबाबत महापौर सौ.सरीता मोरे यांनी छ.ताराराणी सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू समाधी विकास समितीची बैठक आयोजित केली होती. समाधी स्थळाजवळील परिसरातील उर्वरीत कामे करणेसाठी येत्या दोन ते तीन दिवसात 70 लाखाची एस्टीमेट सादर करणेच्या सुचना महापौरांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रारंभी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी राजर्षी छत्रपती शाहू समाधी विकास समितीच्या सदस्यांचे स्वागत करुन विषय पत्रिकेचे वाचन केले. विषय पत्रिकेमध्ये छ.शाहू समाधी स्थळ मेघडंबरी लोकार्पण सोहळयाची पुर्व तयारी करणे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकामध्ये दगडी पेटीमध्ये ठेवावयाच्या वस्तू व महाराजांच्या विचारांच्या पाटया लावणेसाठी अनुषंगीक मजकूर या संबंधी विचार विनीमय करणे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाचे लोकार्पण महामहीम राष्ट्रपती यांच्यांच हस्ते व्हावे याबाबत आलेली छ.शाहू प्रेमींची मागणी. श्री.राजगुरु रघुपती पंडीत उर्फ पंडीत महाराज यांचे समाधीबाबत निर्णय घेणे. प्रस्तावीत  विकास कामांचा डीपीआर तयार करणे इत्यादी विषयांचा समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकामध्ये दगडी पेटीमध्ये ठेवावयाच्या वस्तू व महाराजांच्या विचारांच्या पाटयामध्ये महाराजांच्या जन्मापासून निधनांपर्यंतच्या कार्यकालातील कलाकृती सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाचे लोकार्पण सोहळयासाठी पाहुणे ठरविण्याचे अधिकार महपौरसो व पदाधिकारी यांना देण्यात आले. श्री.राजगुरु रघुपती पंडीत उर्फ पंडीत महाराज यांची समाधीबाबत शिवाजी विद्यापीठकडे अभिप्राय मागण्यात आलेला आहे त्याबाबत अद्याप अभिप्राय प्राप्त झालेला नाही. अभिप्राय प्राप्त होताच त्याबाबत चर्चा करु. दगडी पेटीमध्ये शाहू महाराजांची महत्वाची कामे चांदीच्या करंटमध्ये ठेवण्यात यावीत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्पर्शाने व कार्याने नावारुपाला आलेल्या 23 ठिकाणांची माती स्माकराच्या ठिकाणी ठेवणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळी मेघडांबरीचे काम पुर्ण झाले असून समाधी स्थळाजवळील आसपासचा परिसर विकसीत करणे आवश्यक आहे. यासाठी मेनगेट समाधी स्थळापर्यंत पाथवे करणे, लॅण्डस्केपींग करणे, लाईट इफेक्टस, लॉन करणे हि कामे लोकार्पण सोहळयापुर्वी करणे आवश्यक आहे. यासाठी हि कामे दोन महिन्यात पुर्ण करण्यात यावी.

उपमहापौर भुपाल शेटे यांनी बोलताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या उर्वरीत कामासाठी प्रशासनाने काय नियोजन केले आहे याबाबत विचारणा केली. समाधी स्थळाचे काम महत्वाचे असलेने बजेट कमी पडत असेल तर नविन बजेटमध्ये तरतूद करा. स्मारकाचे काम ताताडीने व्हावे अशी सर्व नगरसेवकांची भावना आहे. त्यामुळे प्रसंगी आमच्या सर्व सदस्यांच्या बजेटला कात्री लावून उर्वरीत कामासाठी निधी उपलब्ध करुन दया. उर्वरीत कामाचे एस्टिमेट तातडीने सादर करा यासाठी लगणारा निधी उपलब्ध करुन देणेसाठी विशेष सभा घेवू असे सांगितले.

गटनेते शारगंधर देशमुख यांनी बोलताना समाधी स्थळाला आमदार बंटी पाटीलसाहेब यांची भेट झाली त्यावेळी उर्वरीत कामाबाबत एस्टीमेट सादर करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. अद्याप एस्टिमेट सादर का करण्यात आले नाही. बजेटबाबत पदाधिकाऱ्यांना कल्पना दया परस्पर कोणताही निर्णय घेवू नका. मंजूर झालेली कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया संथगतीने आहे. पाच लाखाच्या कामाला दोन वर्षे लागतात.

समाधी स्थळाच्या उर्वरीत कामाचा निधी त्वरीत देऊन काम तातडीने पुर्ण झाले पाहिजेल. याबाबत दार आठवडयाला बैठक घ्यावी अशा सुचना गटनेते देशमुख यांनी केल्या. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी उर्वरीत कामासाठी 70 लाखाची तरतूद करणे आवश्यक असलेचे सांगितले. त्याचे एस्टिमेट दोन ते तीन दिवसात सादर करत असलेचे सांगितले. ठेकेदार व्ही के पाटील यांनी कंपौडचे डेकोरेटीव्ह स्टोनचे काम असलेने याकामासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार असलेचे सांगितले.

महापौर सौ.सरीता मोरे यांनी बोलताना समाधी स्थळाचे काम तीन महिन्या ऐवजी दोन महिन्यात पुर्ण करा. यासाठी शहर अभियंता यांना दोन दिवसांत एस्टिमेंट सादर करावे. निधीच्या तरतूदीसाठी 9 जानेवारी 2019 ला विशेष सभा बोलवत असलेचे सांगितले. समाधी स्थळाचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे. काम जलद गतीने होणेसाठी पुन्हा आठ दिवसाने बैठक घेणार असलेचे सांगितले.

यावेळी परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, सभागृहनेता दिलीप पोवार, प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, नगरसेविका सौ.हसिना फरास, स्थानिक नगरसेविका सौ.मेहजबीन सुभेदार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपशहर अभियंता एस.के.माने, सहाययक अभियंता एन एस पाटील, शिल्पकार किशोर पुरेकर, विजय पाटील, अमोल साळोंखे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)