व्यक्तिमत्व : तयारी जिंकण्याची (भाग-2)

व्यक्तिमत्व : तयारी जिंकण्याची (भाग-1)

-सागर ननावरे 

तहान लागली की विहीर खणायला जांणे अशी म्हण मी अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पूर्वी तिचा अर्थ नीट समजला नव्हता. पण जसे वय वाढत गेले, अनुभव येत गेले, तसा तिचा अर्थ मनात ठसत गेला. योग्य वेळी योग्य काम न करणे म्हणजे तहान लागली की विहीर खणायला जाणे.

स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र शालेय जीवनात असतानाची गोष्ट. वार्षिक परीक्षेचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी नरेन्द्रांचा भूमितीचा पेपर होता. आणि नरेंद्र मात्र आदल्या दिवशी एका मंदिरात निवांत वीणा वाजवित बसले होते. त्यांचा वर्गमित्र त्यांना शोधीत मंदिरात त्यांच्यापाशी पोहोचला.

नरेन्द्रांना वीणा वाजविताना पाहून आश्‍चर्यचकित होऊन तो त्यांना म्हणाला,अरे नरेंद्र, उद्या आपल्या वार्षिक परीक्षेचा महत्त्वाचा पेपर आहे. आणि तू अभ्यास करायचा सोडून खुशाल इथे वीणा वाजवित बसला आहेस. तू पास कसा होशील?

यावर स्मितहास्य करीत नरेंद्र उद्गारले,अरे मित्रा उद्याची परीक्षा ही आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो आहे त्याची नाही. मी वर्षभर अभ्यास वेळीच करत आलो आहे.

मित्रानो आपलेही असेच असते परीक्षा आली की अभ्यास करायचा, एखादा फॉर्म भरायचा असेल तर अगदी शेवटच्या दिवशी धावपळ करायची, थोडक्‍यात काय, तर कोणत्याही कामाची डेडलाईन आली की आपण जागे होतो. याने आपल्याला ऐनवेळी मानसिक ताण आणि शारीरिक दगदगीचाही सामना करावा लागतो. बर त्यातही काम झाले तर ठीक अन्यथा अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो.

म्हणूनच योग्य वेळी योग्य त्या गोष्टीना प्राधान्य देऊन त्याची निर्धारित वेळेआधी पूर्तता करता आली पाहिजे. म्हणूनच कामे करताना प्रथम त्या कामाचे स्वरूप समझजून घ्या. कामाबाबत विचार करा की खरंच या कामाला खूप वेळ लागणार आहे का ? खरंच आपल्याकडे तेवढा वेळ आहे का ?

हे काम आपण रोज थोडे थोडे करून निर्धारित वेळेत पूर्ण करू शकतो का ? या प्रश्‍नांची उत्तरे शोधा म्हणजे तुमची अनेक कामे वेळच्या वेळी पूर्ण होतील.

चला तर मग तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच त्याची तजवीज करूया. जिंकण्यासाठी आधीच जिंकण्याची पूर्वतयारी करूया. मग बघा ती कामे विनात्रास आणि विणताण सहज साध्य होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)