व्यक्तिमत्व : तयारी जिंकण्याची (भाग-1)

-सागर ननावरे 

तहान लागली की विहीर खणायला जांणे अशी म्हण मी अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पूर्वी तिचा अर्थ नीट समजला नव्हता. पण जसे वय वाढत गेले, अनुभव येत गेले, तसा तिचा अर्थ मनात ठसत गेला. योग्य वेळी योग्य काम न करणे म्हणजे तहान लागली की विहीर खणायला जाणे.

हे प्रत्येकाबाबत घडत असते. अनेकदा योग्य गोष्टींची योग्य वेळी पूर्तता न केल्यामुळे वाढणारे त्याचे ओझे आपले कंबरडे मोडून काढत असते.मग ते कार्यालयीन ,शालेय, सामाजिक किंवा घरघुती काम असो. त्याने अनेक वेळेस शारीरिक त्रासासोबतच मानसिक ताणही आपल्याला सहन करावा लागतो.

माझ्या दोन मित्रांचे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. दोन मित्रांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली. काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला. त्यात एकजण चांगल्या गुणांनी पास झाला. दुसरा मात्र अगदी कमी गुण मिळवून अनुत्तीर्ण ठरला.

त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षकांनी दोघांना भेटण्यास बोलावले. ते भेटायला गेले असता शिक्षकांनी दोघांना उद्देशून प्रश्‍न केला की,तुम्ही दोघेही माझे हुशार विद्यार्थी आहात. मी तुम्हा दोघांना चांगलेच ओळखतो. परंतु एमपीएससीची पूर्वपरीक्षेत तुमच्यापैकी एक जणच कसा काय उत्तीर्ण झाला.

यावर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने शरमेने मान खाली घातली. शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्याला विचारले,काय रे पहिल्याच प्रयत्नात पास होण्याची किमया तू कशी केलीस? त्यावर तो विद्यार्थी बोलला,सर, एमपीएससी पास होऊन प्रशासकीय अधिकारी होणे हे आमच्या दोघांचे स्वप्न होते.

आम्ही दोघांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले. परंतु आमच्यात फक्त एकच फरक होता. मी अगदी शालेय जीवनापासून सामान्य ज्ञान आणि इतर विषयांचे वेळ मिळेल तसे वाचन केले. परिणामी मला ऐन परीक्षेच्या काळात जास्त प्रयत्न करावे लागले नाहीत.

याउलट माझ्या मित्राने मात्र परीक्षा जाहीर झाल्यावर प्रयत्नांना सुरुवात केली. त्यामुळे कमी वेळेत अधिक अभ्यासक्रमाचे ओझे त्याला पेलले नाही. आणि म्हणूनच त्याला अपयश आले. वरील या सत्य प्रसंगातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. या बाबतीतली स्वामी विवेकानंदांची ऐकण्यात आलेली एक गोष्ट आठवते.

व्यक्तिमत्व : तयारी जिंकण्याची (भाग-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)