शाहूनगरवासीयांची लक्ष्मीपुजनासाठी जय्यत तयारी

बस स्थानक, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

सातारा – दिवाळीसाठी रांगोळी, पणत्या, आकाशकंदील आणि कपडेखरेदीसाठी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत,राजपथावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनासाठी सातारकरांनी जय्यत तयारी केली आहे .त्याचवेळी आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांनी एसटी स्टॅंड आणि रेल्वे स्टेशनही फुलल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात गर्दीचा लोंढा बाजारपेठेत आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. परिणामी, खरेदीसाठी आलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पोवई नाका व राजपथ येथील वाहतूक गर्दीमुळे कोलमडल्याची स्थिती निर्माण झाली.

खरेदीसाठी राजपथ विसावा नाका , चाहूर फाटा कॉर्नर, शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ येथेमोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. परिणामी, मध्यवर्ती बाजारपेठेसह आसपासच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा भार वाढला. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने, मिळेल त्या जागी वाहन लावले जात होते. या बेशिस्तीमुळे कोंडीत आणखी भर पडली. लक्ष्मीपूजनाच्या तयारीची सराफ कट्टयावर विशेष गडबड होती . हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजनाचाच मानला जातो . नरकचर्तुदशी व लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्ताची खात्री करून घेण्यात आली . हा सर्वात मोठा आनंददायी सण आहे. या सणामुळे समाजात-कुटुंबात एकोपा राखला जातो, असे ज्योतिष मोहन प्रभुणे यांनी सांगितले.

एसटी स्टॅंडबाहेरही कोंडी
दिवाळीच्या निमित्त एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. खाजगी ट्रॅव्हल्स आणि रिक्षाने येणाऱ्या प्रवाशांमुळे एसटी स्टॅंडच्या परिसरात वाहतुकीचा फज्जा उडाला होता. त्यातच बाहेरगावी जाणाऱ्या बसच्या रांगा लागल्या होत्या. मराठवाडा, विदर्भ, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

वाहनचालकांची कसरत
शहराच्या मध्यवस्तीत खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची पार्किंगसाठी जागा उपलब्ध न झाल्याने प्रचंड गैरसोय झाली. विशेषतः राजपथ व खण आळी, जुना मोटार स्टॅंन्ड व राधिका चौक, मारवाडी चौक, आणि आसपासच्या परिसरात पार्किंगची समस्या उद्भवली होती. पार्किंगला जागा मिळविण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

कोंडीची शक्‍यता
खरेदीसाठी आणि गावी जाण्यासाठी मंगळवारी हीमध्यवर्ती शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त बंदोबस्त नेमला आहे. राजवाडा, विसावा नाका, बुधवार नाका, आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रामुख्याने बंदोबस्त असणार आहे. बुधवार नाका, पोवई नाकाआणि कृष्णानगर सातारा मध्यवर्ती आगार राजवाडाएसटी स्टॅंडसह जुना आरटीओ चौकया परिसरातही वाहतूक पोलिस नेमण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)