मुली दत्तक घेऊन विसरली प्रिती झिंटा

प्रिती झिंटाने 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये 34 मुलींना दत्तक घेतले होते आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती, पण आता प्रिती आपल्या या दत्तक घेतलेल्या मुलींना विसरली आहे. ती कधीच त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांचा खर्चही देत नाही. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलच्या संस्थापिका शाइला इत्तेफाम यांनी सांगितल्यानुसार, 34 मुलींचे पालनपोषण आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचन देऊन प्रिती आता विसरली आहे.

प्रिती अनेक वर्षांपासून शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंट नाराज आहे. लग्नापूर्वी 2009 मध्ये प्रितीने आपल्या 34 व्या वाढदिवशी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी तिला परवानगी देण्यात आली होती. तिने अनाथ मुलींना दत्तक घेतले होते. लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत येथे आली होती. शाइला म्हणते की, काही वर्षांपूर्वी ती शाळेत आली, तेव्हा फक्त मुलींसोबत फोटो काढून निघून गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रिती झिंटा अन्यही काही सामाजिक कामांमध्ये सक्रिय असते. विशेषतः महिलांसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये तिचा सहभाग असतो. स्त्री भ्रूण हत्येविरोधातील आंदोलनामध्ये तिचा सहभाग प्रामुख्याने असतो. आपल्या बॉलिवूड करिअरच्या बरोबरीने तिने हॉर्वर्ड बिजनेस स्कूलमधून डिग्रीही मिळवली होती. शानदार अमरोही यांचे 2011 मध्ये निधन झाले, तेव्हा त्यांची वारसदार म्हणून तिला 600 कोटी रुपयांची मालमत्ता मिळाली होती. शानदार अमरोही यांनी तिला दत्तकच घेतले होते. मात्र, प्रितीने हे पैसे स्वीकारले नव्हते. पण महिलांसाठी एवढी सजग असलेली प्रिती झिंटा आपणच दत्तक घेतलेल्या मुलींबाबत एवढी अनास्था कशी काय? दाखवू शकते, हा एक प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)