थेट दागिने खरेदीलाच ग्राहकांकडून पसंती

सराफ बाजारातील बदल : सोने खरेदी वाढल्याचे निरीक्षण

पुणे – मागील काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, जीएसटी, नोटाबंदीनंतर गुंतवणूक करण्यापेक्षा थेट दागिने खरेदी करण्यास नागरिकांची पसंती मिळत आहे. “गोल्ड इन गोल्ड’ म्हणत पुणेकरांनी सोन्याचे खरेदी करूनच दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यावर्षी दिवाळीत बाजारात निर्माण झालेल्या तेजीमुळे सोने खरेदी वाढल्याचे निरीक्षण सराफ व्यावसायिकांनी नोंदविले.

दिवाळीच्या काळात बाजारात समाधानकारक चित्र दिसून आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. याविषयी बोलताना पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, “नोटबंदी, त्यानंतर आलेल्या जीएसटीमुळे (वस्तु आणि सेवा कर) सराफ बाजारात बदल झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी प्रामुख्याने सोने हे गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याचे प्रमाण आढळत होते. मात्र, ते यावर्षी कमी झाले आहे. ग्राहक थेट दागिने खरेदी करत आहेत. पुणे शहराचा विस्तार खूप मोठा आहे. येथील सोन्याच्या उलाढालीचा अंदाज लावणे खुप कठीण आहे. तरीही गेल्या वर्षीप्रमाणे ग्राहकांचा प्रतिसाद यंदाही दिसून आला आहे.’ तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यातील भावाच्या तेजीचा विचार करता ग्राहकांनी दिवाळीच्या मुर्हुतावर सोने खरेदी केल्याचेही काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)