पेरणीपूर्वी सावधान, बियाणे निवडा छान! (भाग- २)

डॉ. विजय शेलार, डॉ. अविनाश कर्जुले व डॉ. युवराज बालगुडे 
बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
6) टॅग म्हणजेच खूणचिठ्ठीवर कोणती माहिती दिलेली असते आणि त्याचे महत्त्व काय आहे ? 
*बियाण्याची गुणवत्ता नियंत्रणासाठी बीज प्रमाणिकरण यंत्रणा/संस्था काम करीता असते
*त्यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे बीजोत्पादन घ्यावे लागते आणि तयार झालेले बियाणे प्रमाणीकरणसंस्थेने दिलेल्या मानकांप्रमाणे असावे लागते.
*बियाण्याच्या गुणवत्ते विषयीची माहिती या खूणचिठ्ठी वर छापलेली असते.
*यामध्ये बियाणे कोणत्या पिकाचे आणि जातीचे आहे याची माहिती दिलेली असते.
*बियाण्याची उगवणक्षमता, ती तपासल्याची तारीख, बियाणे वापराची अंतिम तारीख नमूद केलेली असते.
*बियाणे कोणत्या स्टेजचे,प्रकारचे आहे.
*टॅगवरील क्रमांक, साठा क्रमांक म्हणजेच लॉट नंबर या बाबी सुध्दा तपासून घेणे महत्त्वाचे असते.
*या टॅगवर बियाण्याची अनुवंशिक शुध्दता, भौतिक शुध्दता, बिजोत्पादक यांची माहिती दिलेली असते.
*तसेच या टॅगवर बिजोत्पादक, बीज प्रमाणिकरण अधिकारी यांची सही शिक्का आहे किंवा नाही हे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे.
*तसेच बियाणे मोहोरबंद असल्याची खात्री करुन घेतली पाहिजे
7) बियाणे खरेदीची पावती किंवा बील याचे काय महत्त्व आहे? 
*ज्या शेतकऱ्याच्या जमिनीत पेरणी करावयाची आहे त्याच शेतकऱ्याचे नावे बियाणे खरेदीची पावती असणे आवश्‍यक आहे.
*पावतीवर बियाणे खरेदीचा दिनांक, बियाण्याच्या टॅगवर असलेला पीक, जातीचे नाव, लॉट नंबर इ. माहिती लिहली असल्याची खात्री करून घ्यावी.
*शेतकऱ्यांना बियाण्यात काही दोष आढळला तर खरेदीची पावती, बियाण्याचा पिशवी, टॅग या गोष्टी शेतऱ्यांना तक्रार करण्यासाठी आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप आवश्‍यक असतात.
8) बियाणे सदोष असणे म्हणजे काय? 
*आपण बियाणे जेव्हा खरेदी करतो तेव्हा बियाण्याच्या पिशवीवर जो टॅग असतो त्यावर बियाण्याच्या गुणवत्ते विषयी माहिती दिलेली असते. त्या गुणवत्तेप्रमाणे बियाणे नसणे यालाच बियाणे सदोष आहे असे म्हणतात.
*यात प्रामुख्याने बियाणे उगवणक्षमतेचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेच्या माणकांनूसार प्रत्येक पिकांत न्यूनतम किती उगवणक्षमता असावी याचे प्रमाण ठरवून दिलेले असते. त्यापेक्षा कमी प्रमाणात उगवण असणे हे सदोष बियाण्याचे एक लक्षण आहे.
*तसेच बियाण्याची भौतिक शुध्दता टॅगवर नमुद केलेली असते. भौतिक शुध्दता म्हणजे बियाण्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी, टॅगवरील माहितीपेक्षा यांचे प्रमाण जास्त असल्यास बियाणे भौतिक दृष्ट्या शुध्द नाही असे समजावे. बहुतेक पिकांचे बियाणे 98टक्के शुध्द असते.
*बियाणे अनुवंशिक दृष्ट्या शुध्द असणे आवश्‍यक आहे. म्हणजेच बियाणे पेरल्यानंतर रोपांचा किंवा झाडांचे बाह्य गुणधर्म एकसारखे असावेत, झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या, फुले, झाडांची उंची यामध्ये विविधता आढळल्यास बियाणे अनुवंशिक दृष्ट्या शुध्द नाही असे समजावे.
 9) बियाणे पेरणी करताना काय काळजी घेणे आवश्‍यक आहे? 
*पेरणी करताना जमिनीमध्ये ओलाव्याची स्थिती बियाणे उगवणीसाठी पोषक असावी.
*बियाण्याची पेरणी शिफारस केलेल्या वेळेतच करावी
*बीजप्रक्रिया, पेरणीचे अंतर, खताची मात्रा शिफारस केल्याप्रमाणेच कराव्यात.
* बियाण्याची पिशवी नेहमी खालच्या बाजूने फोडावी म्हणजेच ज्या बाजूला टॅग आहे ती बाजू तशीच व्यवस्थित राहु द्यावी.
*तसेच बॉक्‍स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी
*या बियाण्याचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्‍समध्ये राखून ठेवावा.
*बियाणे संदोष असल्यास तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना तपासणीसाठी देता येईल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)