“लोकसभा निवडणूक 2019 पूर्वपिठीका’ उपयुक्त ठरेल

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचा विश्‍वास

सातारा – जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघांच्या 1952 पासूनच्या आकडेवारीची अचूक माहिती तसेच निवडणूक विषयक विविध संपर्क क्रमांक असलेली “45-सातारा मतदार संघ निवडणूक 2019 पूर्वपिठीका’ ही पुस्तिका प्रसार माध्यमांना व अभ्यासकांना निश्‍चितच उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 45- सातारा मतदार संघ निवडणूक 2019 पूर्वपिठीकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते त्यांच्याच कक्षात करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव आदी उपस्थित होते.

या पुस्तिकेमध्ये 1952 पासूनच्या लोकसभा निवडणूकांची आकडेवारी अचूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच लोकसभा निवडणूक 2019च्या अनुषंगाने काय करावे, काय करू नये, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे तिचे कार्य, आदर्श आचारसंहिता, आदी महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तिकेत आहे. तसेच मतदार संख्या, निवडणूक विषयक महत्वाचे दूरध्वनी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांचे दूरध्वनी आदी संपर्क दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)