तोगडिया यांची पंतप्रधानांवर पुन्हा टीका 

नागपूर: विश्‍व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रविण तोगडिया यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राम मंदिराच्या उभारणीचे आश्‍वासन पूर्ण न केल्याबद्दल जोरदार टीका केली. “हिंदुराष्ट्रामध्ये मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान असणार नाही, असे मुळीच नाही.’ असे प्रतिपादन केल्याबद्दलही तोगडिया यांनी सरसंघचालक भागवत यांच्यावर टीका केली. भागवत यांनी गेल्या महिन्यात झालेल्या संघाच्या तीन दिवसांच्या विचार परिषदेदरम्यान हे प्रतिपादन केले होते.
“हिंदू राष्ट्र म्हणजे त्यात मुस्लिमांना स्थान नाही, असे होत नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल, त्यादिवशी ते हिंदुत्व राहणार नाही. वसुधैव कुटुंबकम म्हणजे हिंदुत्व आहे.’ असे भागवत म्हणाले होते. मात्र गायी मारणारे, लव्ह जिल्हाद, दगड फेक करणारे आणि जम्मू काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी फडकावणाऱ्यांशिवायही हिंदुत्व असू शकते का, असा सवाल तोगडिया यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.
“आम्ही 52 वर्षांपूर्वी हिंदूंची संघटना समजून संघामध्ये जायला लागलो होतो. मात्र आता आम्हाला वाटते आहे की संघात मुस्लिम समाजाचीच काळजी केली जाते आहे. संघाला आता राम मंदिराच्या उभारणीमध्ये स्वारस्य उरलेले नाही. पंतप्रधान मोदी मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करत आहेत आणि राम मंदिराच्या उभारणीच्या आश्‍वासनापासून दूर जात आहेत.’ असेही तोगडिया म्हणाले.
ऍट्रॉसिटीच्या कायद्याबाबत बोलताना मोदी यांनी निर्णय संसदेत होईल. कोर्टात होणार नाही, असे म्हटले होते. मात्र जेव्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित होतो, तेंव्हा कोर्टातच निर्णय होईल, असे मोदी म्हणतात. मोदी यांनी हिंदुत्वाबरोबर भाजपचीही विचारधारा सोडून दिली आहे, असा आरोपही तोगडिया यांनी केला.
तोगडिया यांनी विश्‍व हिंदू परिषदेतून बाहेर पडल्यावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाने नवी संघटना सुरू केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून हिंदूंच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केले जाईल. जर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कायम ठेवला तर त्यांना पाठिंबा दिला जाईल, असे तोगडिया यांनी सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)