प्रतिक ब्ब्बर आणि सान्या सागरचा विवाह 23 जानेवारीला

राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर आणि त्याची गर्लफ्रेंड सान्या सागर यांचा विवाह 23 जानेवारीला निश्‍चित झाला आहे. सान्या सागर ही लेखिका, संपादिका आणि दिग्दर्शिका आहे. या शिवाय “एनआयएफटी’मधून फॅशन डिजायनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर तिने लंडनमधून फिल्म एडिटिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

या दोघांचा साखरपुडा वर्षभरापूर्वीच झाला होता. प्रतिक बब्बर आणि सान्या यांच्या अफेअरला दोन वर्षे होऊन गेली आहेत. पण ते एकमेकांना एका दशकापेक्षा अधिक काळापासून ओळखत आहेत. राज बब्बर हे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे नेते आहेत, तर सान्या सागर ही बहुजन समाज पार्टीचे नेते पवन सागर यांची कन्या आहे.

वर्षभरापूर्वी 22 जानेवारी 2018 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. आता बरोबर वर्षभरानंतर 22 आणि 23 जानेवारीला लखनौमध्ये राज बब्बर यांच्या फार्म हाऊसवर दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. त्यानंतर मुंबईमधील फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक मोठे रिसेप्शन दिले जाणार आहे. प्रतिकने यापूर्वी “बागी 2′, “एक दीवाना था’, “जाने तू या जाने ना’, “धोबीघाट’ मध्ये काम केले आहे. आता सुशांत राजपूत आणि श्रद्धा कपूरच्या “छिछोरे’मध्येही तो असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)