प्रियांका गांधींच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने राजकीय चाणक्य प्रशांत किशोर सुखावले

नवी दिल्ली : काँग्रेसतर्फे आज प्रियांका गांधी-वढेरा यांची उत्तर प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने  भारतीय राजकारणामध्ये चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका गांधी यांच्या राष्ट्रीय राजकारणामधील प्रवेशाबाबत राजकीय जाणकारांनी अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. यातच आता २०१४ साली भाजपच्या निवडणूक प्रचाराची पडद्यामागून धुरा सांभाळणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देखील प्रियांका गांधी-वढेरा यांच्या राष्ट्रीय राजकारणातील सक्रिय प्रवेशाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

प्रशांत किशोर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रियांका गांधी-वढेरा यांना शुभेच्छा देताना, “भारतीय राजकारणातील एका बहुप्रतीक्षित प्रवेशाचा योगायोग अखेर आज घडून आला! आता लोक प्रियांकायांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत, त्यांच्या पक्षातील भूमिकेबाबत आणि त्यांच्या पदाबाबत चर्चा करायला लागले आहेत मात्र प्रियांका यांनी राजकारणामध्ये उडी घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तोच माझ्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे.” असा संदेश लिहिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/PrashantKishor/status/1087993234247307264

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)