नाणारवरून प्रमोद जठार यांचे बंड

मुंबई – होय-नाही करता अखेर शिवसेना आणि भाजप युती जाहीर करण्यात आली. मात्र युती झाल्यावर दोन्ही पक्षातील बंड समोर येत आहे. कोकणातील प्रस्तावित नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी बंड केले आहे. “नाणारचा बळी जाणार असेल तर कोकणाला युती नको,” असे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जठार म्हणाले, जर नाणार प्रकल्प रद्द झाला, तर निवडणूक लढवण्याशिवाय मला पर्याय उरणार नाही. मी जनतेसमोर जाण्यास तयार आहे, मी घाबरणारा नाही. पण युतीच्या शिल्पकारांनी ती वेळ आणून देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.

“हे बंड नाही, कोकणातील बेरोजगारांची किंकाळी आहे. ती युतीच्या दोन्ही नेत्यांपर्यंत पोहोचावी ही माझी विनंती आहे. कोणीतरी राजकारणासाठी हा प्रकल्प नाकारणं हे पटत नाही. शिवसेनेला नको, राणेंना नको म्हणून प्रकल्प रद्द करायचा का? प्रकल्प का नाकारता याचं कारण द्या. कारण या प्रकल्पामुळे कोकणातील दीड लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. शास्त्रीय कारण, जनमत चाचणीच्या आधारे प्रकल्प नाकारा. “प्रकल्प रोह्यात चालतो, सिंधुदुर्ग-रत्नागिरीत का नाही? असा सवालही त्यांनी विचारला. नाणार प्रकल्पाबाबत जनमत कौल घ्यावा तसंच प्रकल्प रद्द होऊ नये यासाठी भाजप आमदार, माजी आमदार, मंत्री तसंच प्रकल्प समर्थक सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)