प्रकाश राज यांनी घेतली केजरीवालांची भेट 

नवी दिल्ली : अभिनेते प्रकाश राज यांनी काही दिवसांपूर्वीच आपण लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश राज यांनी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. केजरीवाल आणि प्रकाश राज यांच्या भेटीनंतर लगेचच केजरीवालांनी ‘आप’ण प्रकाश राज यांना लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

सुप्रसिद्ध अभिनेते असलेले प्रकाश राज हे गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर उघडपणे टीका करण्यासाठी चर्चेत असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे संदेश देताना म्हंटले आहे की, “देशाच्या संसदेला प्रकाश राज यांच्यासारख्या खुल्या विचारांच्या लोकांची आवश्यकता असून आम आदमी पक्ष प्रकाश राज यांच्या पक्ष लढण्याच्या निर्णयाचा आदर करत त्यांना आपला पाठिंबा जाहीर करतो.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)