प्रकाश राज यांच्याकडून राजकारणातील प्रवेशाचे सूतोवाच

चेन्नई: दक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी आज राजकारणात प्रवेशाचे सूतोवाच केले. या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश राज यांनी ट्‌विटरवरून सर्व चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या राजकीय कारकिर्दीबाबतची घोषणा केली.

नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या वर्षात आपल्यावर अधिक जबाबदाऱ्या येणार आहेत. चाहत्यांच्या पाठिंब्याच्या आधारे यंदाची लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार आहे, असे प्रकाश राज यांनी आपल्या ट्‌विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र मतदारसंघाबाबतचे तपशील लवकरच जाहीर केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. संसदेमध्येही “अब की बार जनता की सरकार’ असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रकाश राज यांनी अलिकडेच टीका केली होती. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर लंकेश यांना न्याय मिळावा यासाठी प्रकाश राज यांनी जोरदार आवाज उठवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)