बोलाची कढी बोलाचा भात ,हेच काँग्रेसचे धोरण – प्रकाश जावडेकर

पुणे – काँग्रेस 50 वर्षात सत्तेत होती पण कधी गरिबांना 12 रुपये दिले नाहीत. अशी काँग्रेस आता केवळ निवडणुका जिंकण्यासाठी 72 हजार रुपायांची घोषणा काँग्रेसने केली असून काँग्रेस कन्फ्यूज पार्टी असल्याची टीका भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पुण्यात केली. यावेळी काँग्रेसने पंतप्रधान मोदीवर केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युतर दिले.

जावडेकर म्हणाले की, काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. मात्र, गरीबी नाहीच तर गरीबच हटविले गेले. मोदीच्या परदेश दौऱ्यावर आता पर्यंत झालेला खर्च सांगितला जातो. मात्र, तेवढाच खर्च आणि दौरे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात झाले. मात्र, प्रतिसाद फक्त मोदींना मिळत असून देशात भारताची प्रतिमा उंचावली आहे. ज्यांनी 50 वर्षे सत्ता भोगली त्यांना जीडीपी कधीही 3 ते 4 टक्के नेता आला नाही मात्र आता तो 12 टक्के करणार म्हणताहेत. या केवळ निवडणूक घोषणा असून काँग्रेस सत्ता मिळणार नसल्याने या घोषणा करत आहे. ते पराभव समोर दिसत असल्यामुळे भूलथापा देत आहे. त्यामुळे बोलाची कढी बोलाचा भात अशी परिस्थिती काँग्रेसची आहे.

काँग्रेसने केवळ 2 वर्षांपूर्वी राजस्थान, कर्नाटक पंजाब मध्ये शेतकरी कर्जमाफी घोषणा केली मात्र, काहीच नाही. त्यामुळे कॉग्रेस केवळ बोलते करत काहीच नाही. म्हणून देशाने त्यांना नाकारत मोदीना सत्ता दिली असल्याचे ते म्हणाले.

विजय मल्ला,निरव मोदी यांनी जी फसवणूक केली आहे.त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. गेल्या पाच वर्षात देशाची फसवणूक करुन परदेशात गेलेल्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत त्यात काही प्रमाणात यश सुद्धा मिळाले आहे.निरव मोदी ला तर अटक झाली आहे.आता विजय मल्ल्या सुद्धा लवकरच भारतात येईल. असे ही जावडेकर यांनी स्पष्ट केले.

घराणेशाहीवर जावडेकरांचा काढता पाय

देशात भाजपसाठी अनुकूल वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जनतेचा विश्वास आहे. मग भाजपने ज्या राजकीय घरण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांची मुलं पक्षात कशी घेतली असा प्रश्न विचारतात भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी आपली पत्रकार परिषद गुंडाळली. आपण केवळ काँग्रेसाच्या आरोपावर बोलणार असल्याचे सांगत पत्रकार प्रश्न विचारत असतानाही काढता पाय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)