सुशीलकुमार शिंदे काँग्रेस पक्षाचं बुजगावणं ; प्रकाश आंबडेकरांचे प्रतिस्पर्ध्यावर टीकास्त्र

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तलवारी भिडल्या असून मैदानावरील रणसंग्राम सुरु झाला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, सोलापूरमधील काँग्रेसचे उमेदवार आणि प्रकाश आंबडेकरांचे प्रतिस्पर्धी सुशीलकुमार शिंदे यांचा देखील जोरदार समाचार घेतला.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री असताना बीएसएफ, अर्धसैनिक दल त्यांच्या अखत्यारित होतं. या दलांना बुट आणि जॅकेट्ससाठी चामड्याची गरज असते. महाराष्ट्र सरकारने राज्यातील चर्मकाऱांसाठी लेदर डेव्हलपेंट कार्पोरेशन निर्माण केलं आहे. मात्र, सोलापूरात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या चर्मकार आणि ढोर समाजासाठी शिंदेंनी काहीही केले नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

तसेच सोलापुरातल्या बौद्धांच्या आणि मातंगांच्या सवलतींसाठी कधी मोर्चा काढला नाही त्यामुळेच ते केवळ दलितांमधील एक नाव आणि काँग्रेस पक्षाचं बुजगावणं आहेत असल्याची टीका त्यांनी केली.

सोलापूरलोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरयांच्या पदयात्रेला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली असून आज ते अर्ज भरणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)