प्रकाश आंबेडकरांकडून भिडेंना ‘क्लीन चिट’?

पुणे: भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भिमा चौकशी आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. आंबेडकरांनी आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणी केली. मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ‘सर्वजनिक समारंभात बोलणे वेगळे आणि चौकशी आयोगासमोर बोलणे वेगळे,’ अशी भूमिका मांडल्याने आतापर्यंत भिडेच मास्टरमाइंड असल्याचं सांगणाऱ्या आंबेडकरांनी ‘भिडेंना’ क्लीन चिट दिली काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-Ads-

आज आयोगासमोर आपली बाजू मांडताना प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामीण पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात भिमा कोरेगाव हिंसाचाराला मिलिंद एकबोटे सहभागी असल्याचं दाखवून दिलं. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि पुणे पोलिसांचा तपास यांच्यामध्ये विरोधाभास असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)