#HBD  अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस

अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ८ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यात जन्मलेली प्राजक्ता माळी ही टीव्ही, मराठी सिनेअभिनेत्री असून ती एक उत्तम डान्सरही आहे. प्राजक्ता माळीने भरतनाट्यम मध्ये विशारद मिळवली आहे. २००८ पासून प्राजक्ता माळीने स्टेज शो करण्यास सुरुवात केली. यामधील कालावधीत प्राजक्ता माळी सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातून पहिल्यांदा ऑन कॅमेरा दिसली. शिवाय तिने स्टार प्लस वाहिनीवरील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी डान्स शोमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.

२०११ पासून प्राजक्ता माळीने टीव्ही अभिनेत्री म्हणून अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. सुवासिनी, जुळून येती रेशीम गाठी, फिरून नवी जन्मेन मी, बंध रेशमाचे, नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने यासारख्या सिरिअल्समध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका केल्या आहेत. याशिवाय झी मराठी, ईटीव्ही मराठी आणि साम मराठी या वाहिन्यावरील कार्यक्रमात सूत्रसंचलनही केले आहे. २०१४ मध्ये ‘खो-खो’ या चित्रपटातून प्राजक्ता माळीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तांदळा-एक मुखवटा, हम्पी, गांधी- माय फादर, संघर्ष या चित्रपटामध्ये तिने भूमिका केल्या आहेत. तसेच निम्मा-शिम्मा राक्षस, शिवपुत्र शंभूराजे या नाटकांमध्येही तिने काम केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)