पहलाज निहलानींवर कंगणाचे गंभीर आरोप

बॉलीवूडची “क्‍विन’ अभिनेत्री कंगना राणावत ही बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिने निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निहलानी यांच्या “आय लव्ह यू बॉस’ या चित्रपटात मी काम करणार होते. या चित्रपटासाठी त्यांनी मला अंतर्वस्त्र न घालता केवळ रोब (पारदर्शक गाऊन)घालून फोटोशूट करायला सांगितले होते. या आरोपामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कंगना म्हणाली, हा चित्रपट एक सॉफ्ट पॉर्न चित्रपट होता. चित्रपटातील माझी एका मुलीची भूमिका होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. परंतु भूमिकेविषयी आणि फोटोशूटबद्दल ऐकल्यानंतर मी त्या चित्रपटाला नकार देऊन तिथून पळ काढला. यानंतर मी काही दिवस लोकांपासून लांब राहिले. तसेच मी माझा फोन नंबरदेखील बदलला होता.

दरम्यान, बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत लोकांना सहजासहजी प्रवेश मिळत नाही. अनेकांना त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. अनेक कलाकारांना या काळात इंडस्ट्रीतल्या प्रस्थापित कलाकार, निर्मात्या-दिग्दर्शकांकडून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. कंगना राणावतदेखील त्याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिलाही अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)