महाराष्ट्राच्या 14 एनएसएस स्वयंसेवकांचा राजपथ पथसंचलनासाठी सराव

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी दिल्लीत सराव करीत आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्‍यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे 1 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत. पुणे विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थीनी, तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थीनी असे एकूण 16 स्वयंसेवक या शिबीरात सराव करीत आहेत.

महाराष्ट्राच्या चमुत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा अक्षय जगदाळे, पुणे येथील सिंहगड इंस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी एण्ड सायन्स नर्हे महाविद्यालयाचा दर्पेश डिंगर, पुणे येथील के बी जोशी इंस्टिट्यूट ऑफ आयटी महाविद्यालयाची श्रद्धा वंजारी, दौंड तालुक्‍यातील वरवंड येथील एकनाथ सीताराम महाविद्यालयाची पुजा पेटकर, अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा सागर लापुरकर, मुंबईतील माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालयाचा सुमंत मोरे, मुंबईतील अंधेरी येथील ठाकुर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा आदर्श चौबे, नाशिक जिल्हयातील लासलगांव येथील नुतन विद्या प्रसारक मंडळ कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचा पुष्पक जगताप, नागपूर जिल्हयातील साकोली येथील एस. बी. के. महाविद्यालयाची भुमेश्वरी पुरमकर, मुंबई येथील उषा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी महाविद्यालयाची हिमाद्री पांड्या, मुंबई येथील एम एल डहाणुकर महाविद्यालयाची शिवानी गोखले, अमरावती जिल्हयातील पुसद येथील वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाची पुजा केवटे, नागपूर येथील शंकरनगर परिसरातील लाड महाविद्यालयाची श्रुती जाभुंळकर यांचा समावेश आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)