काळोखे मायलेकरांचे बँकेत खोलले खाते

नगरसेविका दीपाली बंग यांनी मानधन व इतरांनी पैसे केले जमा

पाथर्डी – दिव्यांग रामा काळोखे व त्याची 85 वर्षे वयाची वृद्ध आई शांताबाई काळोखे यांच्या मदतीसाठी माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका दीपालीताई बंग धाऊन आल्या आहेत. बंग यांनी पालिकेच्या मासिक बैठक भत्त्याची मिळालेली पाच हजारांची रक्कम काळोखे मायलेकरांना दिली आहे.

-Ads-

काळोखे मायलेकरांच्या इच्छेनुसार लालकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेत रामा काळोखे यांच्या नावाने खाते उघडून त्यावर पाच हजार रुपये बंग यांनी जमा केले. सुमारे 45 वर्षे वयाचा रामा काळोखे दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याची वृद्ध आई शांताबाई काळोखे यांचे वय 85 वर्षे झाले आहे. मुलाची तीन चाकाची सायकल ढकलून शांताबाई दिवसभर भिक्षा मागतात.

रामाला प्रत्येक कामाला आईचीच मदत लागते. घरदार नसल्याने दोघेही बसस्थानकात झोपतात. शांताबाईंचे वय दिवसेंन दिवस वाढत चालल्याने रामाची सायकल लोटने त्यांना आता कठीण होते. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस दोघांसाठीही दुःखच घेऊन येतो आहे. अशा या अभागी मायलेकराच्या जीवनाची विदारक कहानी दैनिक प्रभातने जगासमोर आणली. त्यांच्या जीवनातील वास्तव ऐकून अनेक दात्यांनी काळोखे मायलेकरांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली. काहींनी खाण्यासाठी अन्न, कुणी घालण्यासाठी कपडे तर कुणी घर बांधण्यासाठी पैसे दिले.

माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बंग व त्यांचे पती माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी काळोखे मायलेकरांना मदतीचा हात दिला. नगरसेविका बंग यांनी गेल्या अनेक वर्षांचा पालिकेतील मासीक बैठकीचा मिळालेला पाच हजार रुपयांचा भत्ता काळोखे कुटुंबाला दिला. इतकेच नव्हे तर मदतीची मिळालेली रक्कम एकत्रित घरबांधणीसाठी उपयोगाला यावेत यासाठी काळोखे कुटुंबाची बॅंकेत खाते उघडण्याची इच्छाही त्यांनी पूर्ण केली.

जीवनात पहिल्यांदाच रामा काळोखेचे बॅंकेत खाते उघडले. नवीन खात्यात पाच हजार रुपयांची रक्कम भरून बॅंकेचे पासबुक काळोखे मायलेकराकडे सुपुर्द केले. यावेळी लालकृष्ण नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक तुषार दारके, हाजी शकील बागवान, विजय भगत, किरण काजळे, सचिन मुनोत, द्वारकानाथ हुलचुते, ज्योती रोडी, सुलभा शोत्रीय, शीतल गुरव पत्रकार बाबासाहेब गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुक्‍याचे सुपुत्र व पुणे येथील उद्योजक अनिल देवढे यांनी यापूर्वी केलेली अकरा हजार रुपयांची मदत दैनिक प्रभातचे पत्रकार बाबासाहेब गर्जे यांनी काळोखे यांच्या खात्यात जमा केली.

मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीनेही टेकले हात!

#प्रभात_प्रभाव : ‘त्या’ मायलेकरांच्या मदतीसाठी सरसावले हात


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
31 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)