प्रभातच्या दत्तक योजनेमुळे सामाजिक हातभार

“मनविसे’च्या वतीने दहावीच्या मुलांना प्रश्‍नसंच, व्यवसायमाला

पुणे -“प्रभात’च्या 10 वी अभ्यासमाला दत्तक योजनेत सहभागी होताना शैक्षणिक व सामाजिक कार्यात हातभार लागला आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केले.
प्रभातच्या 10 वी अभ्यासमाला दत्तक योजनेत मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी 30 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-

दि. 1 ऑगस्ट रोजी मनविसेचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याचे सेलिब्रेशन कोणताही केक कापून, डीजे लावून करण्यापेक्षा गरीब मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीचे वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असणारे वर्ष असते.

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, अभ्यासासाठीची सामुग्री उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांच्या स्व:खर्चातून या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणजेच व्यवसायमाला व प्रश्नसंच दिले आहे.

त्याचबरोबर दैनिक प्रभातमधून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून जे मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी वडगावशेरीतील सुंदराबाई मराठे, शिवराज विद्या मंदिर, आनंद विद्यानिकेतन या शाळांमधून निवडक मुलांचे वर्षभराचे पैसे भरून त्यांना मोफत अंक उपलब्ध करून देऊन प्रश्नसंच, व्यवसायमाला देत आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन वडगावशेरी मनविसे विभागाध्यक्ष कुलदीप घोडके, सोहित बनकर, राजेंद्र पुरोहित यांनी केले. यावेळी सुंदरबाई शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर भागवत, शिवराज विद्यालयाचे वाघमारे सर, आनंद विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक घोगे सर, मासाळ सर, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. दैनिक “प्रभात’चे वितरण प्रतिनिधी अनिल शिरसाठ, महेश लिमये यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)