प्रभात वॉच : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला!

नाणे मावळ : करंजगाव-बुधवडी गावातून करंजगावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर नसलेल्या पेटीत धोकादायक रितीने विद्युत वाहक वाहिनी जोडलेल्या आहेत.

महावितरणाचा अजब कारभार : शेती करंजगावात तर ट्रान्सफॉर्मर बुधवडी गावात


दोन्ही गावांदरम्यान वाहत्या नदीच्या प्रवाहामुळे कामात अडथळा शेतकरी त्रस्त

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणे मावळ – नाणे मावळातील करंजगावच्या शेतकऱ्यांची पिके विजेच्या अनियमिततेमुळे धोक्‍यात आली आहे. वडिवळे धरणामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जोरावर या भागात उसाचे व अन्य अनेक प्रकारच्या पिकांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. महावितरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे येथील शेतकऱ्यांची “धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’, अशी परिस्थिती निर्माण झाली.

करंजगाव भागातील शेतकऱ्यांची वीज पुरवठा करणारी डीपी (ट्रान्सफॉर्मर)चोरीला गेल्यापासून शेतकऱ्यांच्या समाधानासाठी बुधवडी गावातील “ट्रान्सफॉर्मर’मधून विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु वीज ग्राहकांची संख्या पाहता शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. अनेकांच्या पाण्याच्या मोटारी सुरू झाल्यास ट्रान्सफॉर्मरवर ताण निर्माण होतो व ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज जातात. त्यामुळे मोटारी बंद पडतात. हे सतत होत असल्याने बुधवडीतून करंजगावकडे येणारा विजेचा प्रवाह तेथील काही शेतकरी खंडित करतात. त्यामुळे करंजगावच्या शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याचे विद्युत पंप गेल्या अनेक दिवसांपासून बंदच राहत आहेत. दिवसभर शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. याशिवाय पाण्याअभावी पिके धोक्‍यात आली आहेत.

पावसाळ्यात ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यापासून डिसेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असूनही, करंजगावच्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मेहनतीने पेरणी केलेली पिके दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे होतील, अशी भीती येथील शेतकऱ्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केली.

‘ट्रान्सफॉर्मर’ची चोरी हीच मूळ समस्या

गेल्या पाच-सहा वर्षांपासून येथील ट्रान्सफॉर्मर दरवर्षी चोरीला जातात आहे. परिणामी मागील वर्षांचा अनुभव पाहता, यावर्षी महावितरण ट्रान्सफॉर्मर बसवण्यास टाळाटाळ करीत आहेत. दरवर्षी चोरी करणाऱ्या चोरांचा शोध अद्यापही लागलेला नाही.

दरवर्षीच ही समस्या या शेतकऱ्यांना येत असते. येथील सर्व शेतकरी एकत्र येत महावितरणच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर बसवतात. यंदाही शेतकरी या मदतीसाठी तयार असून, महावितरणच्या अधिकारी वर्गाने लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवून शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान द्यावे, असे भावनिक आवाहन शेतकऱ्यांनी महावितरणाकडे केले आहे.

“शेतकऱ्यांच्या समस्येची महावितरणकडून गंभीर दखल घेतली आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला आहे. मी स्वतः पाठपुरावा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– विनोद राणे, अधिकारी, महावितरण, कामशेत.

“वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांची समस्या व्यवस्थित समजावून घेत तातडीने उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.
– विजय जाधव, वरिष्ठ अधिकारी, वडगाव महावितरण कार्यालय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)