महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बाईक रॅलीद्वारे शक्‍तीप्रदर्शन

हडपस विधनसभा मतदारसंघात आढळरावांचा जोरदार प्रचार
हडपसर – शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती संघटना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि. 20) महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जोरदार बाईक रॅलीद्वारे शक्‍तीप्रदर्शन करीत मतदारांना अभिवादन केले. तर सकाळच्या सत्रात अनेक महत्त्वाच्या संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या.

बी. टी. कवडे रस्ता येथील शिवसेना कार्यालयापासून सुरू झालेली ही भारत फोर्ज कंपनी, शिर्केनगर, भीमनगर, जहांगिरनगर, मुंढवा नवीन पुल मार्गे मुंढवा रेल्वे स्टेशन, गावठाण, केशवनगर, मगरपट्टा, बांश्री चौक, ऋषिकेश सोसायटी, साधना विद्यालय, माळवाडी, वीटभट्टी चौक, शिवसेना चौकस भैरवनाथ चौक, डीपी रोड, कुबेरा संकुल, रवीदर्शन, लक्ष्मी कॉलनी, सातव वाडी, काळेपडळ, अमरबाग, मंत्री मार्केट, हडपसर वेस, बंटरशाळा, ग्लायडिंग सेंटर, अग्रवाल इलेक्‍ट्रिक, बनकर चौक,भाजी मंडई, गोंधळेनगर, तुकाईदर्शन, यशराज सोसायटी, निर्मल टाऊनशीप, ससाणेनगर, हडपसरगाव आदी भागात काढलेल्या रॅलीमध्ये बाईकवर स्वार झालेल्या कार्यकर्त्यांमुळे सगळा परिसर भगवामय झाला होता.

खासदार आढळराव पाटील यांच्यासह आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका मंगला मंत्री, आरपीआयच्या नगरसेविका हिमाली कांबळे, लता धायरकर, नगरसेवक उमेश गायकवाड, सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, उपशहरप्रमुख समीर तुपे, भूषण तुपे, विकास रासकर, सुभाष जंगले, के. टी. आरु, प्रभाकर कदम, विक्रम लोणकर, दिलीप झगडे, दिलीप व्यवहारे, संदीप दळवी, चेतन कवडे, शाम नेगल, साहेबराव कवडेंसह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी सकाळी खासदार आढळरावांनी हडपसर मतदारसंघातील निवडक मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शनिवारी दिवसभर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणाऱ्या खासदार आढळराव यांनी प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या उद्देशाने भाजपचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले असून महायुतीच्या पदाधिकाऱ्यामध्ये चांगला समन्वय दिसत असल्याने खासदार आढळराव यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.


आशियातील आजूबाजूच्या अनेक देशांची अर्थव्यवस्था आपल्या देशावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशाचे नेतृत्त्व कोण करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मग आपल्याकडे काय पर्याय आहे. आता राहुल गांधी पर्याय होऊ शकतात का? हे तुम्हीच सांगा. त्यामुळे आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्यायच नाही.
-शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)