#अर्थसंकल्प2019-20 : वीज जोडणी व वितरण प्रणाली विषयीच्या घोषणा

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 27 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला होता. आता मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. येत्या 2-3 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

वीज जोडणी व वितरण प्रणाली –

मागील 4 वर्षात 5 लाख 26 हजार 884 कृषि पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून यावर 5 हजार 110 कोटी 50 लाख इतका खर्च. सन 2018-19 करिता 75 हजार कृषि पंपांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट असून याकरीता रु.1 हजार 875 कोटी इतका खर्च अपेक्षित -वित्तमंत्री

मागील चार वर्षात कृषि ग्राहकांना रु.15 हजार 72 कोटी 50 लक्ष, यंत्रमाग धारकांना 3 हजार 920 कोटी 14 लक्ष व औद्योगिक ग्राहकांना 3 हजार 662 कोटी 29 लक्ष वीज दराच्या सवलतीपोटी अनुदान दिले-वित्तमंत्री

उच्चदाब वीज प्रणाली कृषिपंप वीज जोडण्या देण्याकरीता वापरणे किफायतशीर असल्याने सदर प्रणाली कृषीपंप वीज जोडण्यांसाठी वापरण्याकरिता मागील वर्षी घेतला निर्णय. यासाठी रु.5 हजार 48 कोटी 13 लक्ष खर्च अपेक्षित -वित्तमंत्री

राज्यातील वीज वितरण प्रणालीची क्षमता वाढविणे आणि वीज वितरण प्रणालीचे वृध्दीकरण व आधुनिकीकरण करण्याकरीता नवीन उपकेंद्रे उभारण्याचे व जुन्या उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय. राज्यात 493 उपकेंद्र आणि 212 उपकेंद्राची क्षमता वृध्दी-वित्तमंत्री

कोराडी येथे 1320 मे.वॅ.क्षमतेच्या औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यास तत्वत: मान्यता. यासाठी रु.8 हजार 407 कोटी खर्च अपेक्षित-वित्तमंत्री

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)