सत्ता येते-जाते, आपण राज्य आणि देशासाठी कायम काम करायला हवे- शरद पवार

नांदेड: नांदेड दौऱ्यावर असताना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व सहकार महर्षी, पद्मश्री शामरावजी कदम यांच्या अर्धपुतळ्याचे शरद पवार यांनी अनावरण केले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा या मराठवाड्यातून नेतृत्वाची मोठी फळी निर्माण झाली. ज्यांच्यात कर्तृत्वाची क्षमता आहे, अशा व्यक्तिमत्वांना यशवंतराव चव्हाण यांनी पुढे आणले. अशा लोकांच्या यादीत शामराव कदम यांचं नाव अग्रस्थानी येतं, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं सूत्र मांडलं होतं. त्यासाठीच जिल्हा परिषदा तयार करण्यात आल्या. १९६२ साली जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्यावेळी नांदेडची जबाबदारी शामराव कदम यांनी घेतली. ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळायला हवा यासाठी ते अग्रेसर होते. हा घटक सत्तेच्या मुख्य प्रवाहात कसा येईल, यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. १९६० साली ते विधान परिषदेचे सदस्य होते. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या, तेव्हा विधानसभा लढवणार का अशी विचारणा त्यांना करण्यात आली. मात्र शामरावांनी साफ नकार दिला. ते तेव्हा म्हणाले होते की, मला जिल्ह्यात काम करायचे आहे आणि मला जिल्ह्यात काम करण्याची संधी द्या. पुढे हेच शामराव कदम नांदेड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक संस्था उभारल्या गेल्या, त्या सर्व संस्थांचे नेतृत्व शामराव कदम यांनी केले. नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शामराव कदम यांनी मोठे योगदान दिले. या अशा लोकांमुळे राज्यात जिल्हे उभे राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते पुढे म्हणाले, आज देशात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे. सत्ता येते-जाते. आपण राज्य आणि देशासाठी कायम काम करायला हवे. मागे आपल्या सैनिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आपले ४० जवान त्या हल्ल्यात शहीद झाले. अशा परिस्थितीत आपण सैन्याच्या पाठिशी एकत्र उभे रहायला हवे. संघर्ष होईल, राजकारण करण्यासाठी आपल्या इतर वेळ आहेच. पण अशावेळी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काल एक वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा चिथावणीचं वातावरण निर्माण केलं जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. हे जर चित्र असेल तर आपण सर्वांनी तिथे एकजुटीची शक्ती दाखवणे गरजेचे आहे. आम्ही जवानांच्या आणि सरकारच्या पाठिशी खंबीर उभे आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)