कॉंग्रेस कार्यकारीणीची बैठक पुढे ढकलली

नवी दिल्ली – देशाच्या सीमेवरील तणावग्रस्त घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची येथे गुरूवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ही माहिती दिली. त्यानिमीत्ताने अहमदाबाद मध्ये होणारी राहुल गांधी यांची सभाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला कॉंग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित राहणार होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे काही महत्वाचे निर्णय त्यावेळी घेतले जाणे अपेक्षित होते. भाजप आणि मोदींना आव्हान देण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची ही बैठक थेट मोदींच्याच राज्यात आयोजित करून त्यांना कॉंग्रेसकडून राजकीय आव्हान देण्याची व्युहरचना कॉंग्रेसने केली होती. बैठकीची पुढील तारीख मात्र नंतर जाहीर केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)