नगर – डाक विभागामध्ये प्रधान डाकघर, कॅम्प, अहमदनगर सिटी, आनंदी बाजार, सावेडी रोड, एमआयडीसी अहमदनगर आर. एम., शेवगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, मिरजगाव, पाथर्डी, सोनई व राशीन या पोस्ट कार्यालयामध्ये आधार नावनोंदणी व अद्ययावत सेवा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

या आधार केंद्रामध्ये आधार नावनोंदणी पूर्णपणे निःशुल्क आहे. आधार दुरुस्ती करण्यासाठी 25 रुपये अधिक जीएसटी एवढे शुल्क आहे. आधार नावनोंदणी व सेवा केंद्राचे कामकाज कार्यालयीन वेळेत सुट्टीखेरीज सुरु आहे. या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी. भोसले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)