टपाल विभाग ई-कॉमर्स क्षेत्रात

ग्रामीण कारागीरांना हक्‍काची बाजारपेठ मिळण्याची शक्‍यता

नवी दिल्ली -दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी टपाल विभागाचे ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले. या पोर्टलमुळे ग्रामीण कारागीर, बचत गट, महिला उद्योजक, स्वायत्त संस्था, राज्य आणि केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देशभरातल्या ग्राहकांना आपली उत्पादने विकू शकतील. ग्राहकदेखील पोर्टलवर ऑर्डर नोंदवून डिजिटल भरणा करू शकतील. स्पीड पोस्ट द्वारे उत्पादने घरपोच पाठवली जातील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिन्हा यांनी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बॅंकेसाठी (पीओएसबी) इंटरनेट बॅंकिंग सुविधेसाठी आरंभ केला. सिन्हा यांनी ग्रामीण डाक सेवक आणि टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मेघदूत पुरस्कार प्रदान केले. खरेदीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारी ई-बाजारपेठ राष्ट्रीय अभियान 5 सप्टेंबर 2018 ते 17 ऑक्‍टोबर 2018 दरम्यान राबवण्यात आले होते. प्रमुख केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या संस्था यांनी ई-बाजारपेठेवरून केलेल्या खरेदीला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा उद्देश होता.

या अभियानादरम्यान देशातील 31 राज्यांमध्ये 315 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 9 ऑगस्ट 2016 रोजी प्रायोगिक तत्त्वावर जी- ईएम पोर्टल सुरू करण्यात आले आणि हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली. जीईएममुळे सरकारी खरेदीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशकता आली आहे. खरेदीदार आणि विक्रेते या दोघांचाही वेळ वाचल्यामुळे व्यापार सुलभता वाढीस लागली. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)