डुकराने हॉस्पिटलमधून बालकाचे शव पळवले : बिहार

संग्रहित छायाचित्र...

सहरसा – हॉस्पिटलमधून नवजात बालकाचे शव डुकराने पळवून नेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहरसा येथील सदर हॉस्पिटलमध्ये बुधवारी हा प्रकार घडल आहे. यापूर्वी बिहारमधील एका हॉस्पिटलमधून कुत्र्याने ऑपरेशन केलेल्या रुग्णाचा कापलेला पाय पळवून नेल्याची घटना घडली होती.

बालक मृत जन्माला आले असावे वा मुलगी असल्यने कुटुंबीयांनी तिला झाडीत फेकून दिले असावे अशी एक शंका व्यक्त करण्यात आली आहे. मात्र बुधवारी डुकराला तोंडात बालक घेऊन जाताना लोकांनी पहिले. डुकराच्या तावडीतून बालक सोडवण्याचा लोकांनी प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांच्या समोरच डुकराने बालकाला खाल्ले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार यांनी या बाबत काही माहिती असल्याचा इन्कार केला आहे. असाच प्रकार बक्‍सरमधील एका हॉस्पिटलमध्ये घडला होता. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या एका मजुराचे ऑपरेशन करण्यात आले होते. ऑपरेशन केलेल्या त्या रुग्णाचा पाय कुत्र्याने पळववून नेला. नंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्या प्रसंगीही सिव्हिल सर्जन डॉ. केके लाल यांनी माहिती असल्याचा इन्कार केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)