पूजा धांडची कांस्यपदकाला गवसणी

जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा

बुडापेस्ट (हंगेरी) – भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूने जिंकलेले हे पहिलेच पदक ठरले. हरयाणाच्या 24 वर्षीय पूजाचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. त्याच बरोबर जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारी पूजा ही भारताची चौथी महिला ठरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिने ब्रॉंझपदकाच्या लढतीत 2017 ची युरोपीयन चॅम्पियन ग्रास जॅकब बुलनला 10-7 असे पराभूत केले. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक ठरले. या स्पर्धेत बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. तर अन्य एका सामन्यात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला 62 किलो वजनी गटाच्या रिपिचेज फेरीत हंगेरीच्या मारियाना सास्तिन हिच्याकडून 2-3 असे पराभूत व्हावे लागले.

महिलांच्या 57 किलो गटात पूजाने ब्रॉंझपदकाच्या लढतीत जबरदस्त खेळ केला. तिने पहिल्या फेरीत 6-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीतही तिने प्रतिस्पर्धीला फारशी संधी दिली नाही. 24 वर्षीय पूजाची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पूजाचे हे या मोसमातील दुसरे मोठे पदक ठरले. तिने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.

यापूर्वी भारताच्या अल्का तोमर (2006), गीता (2012) आणि बबिता फोगट (2012) यांनी जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावले आहे. त्याआधी पूजा फोगटला 50 किलो गटात ब्रॉंझपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत युक्रेनच्या ओकसाना लिव्हॅचकडून 5-10 असा पराभव स्वीकारावा लागला. साक्षी मलिक रिपेचेजमध्ये हंगेरीच्या मरियाना सास्टिनकडून 2-3 अशी पराभूत झाली. विजय (55 किलो), गौरव (63 किलो), कुलदीप मलिक (72 किलो), हरप्रीतसिंग (82 किलो) यांना पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)