“सडक 2’मधून पूजा भट्टचे पर्दापण

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डायरेक्‍टर पूजा भट्टच्या मते, भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींचे वय 40 होताच त्यांना काम मिळण्याचे बंद होते. पण, अभिनेते तेव्हाही आपल्यापेक्षा निम्मा वयाच्या भूमिका साकारत असतात. पूजाने अनेक वर्षांपूर्वीच अभिनयाला अलविदा म्हटले होते. मात्र, 18 वर्षानंतर ती पुन्हा “सडक-2′ चित्रपटातून सिल्वर स्क्रीनवर पर्दापण करत आहे.

पूजा म्हणाली, भारतात पुरुष कधीही वयस्कर होत नाहीत, ते सदैव तरूण असतात. त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या महिलांना त्यांच्या आईची भूमिका साकारण्यास दिली जाते. मीही “जख्म’मध्ये अजय देवगणच्या आईची भूमिका साकारली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या पर्दापणबाबत पूजा म्हणते, मी अभिनय करण्यास बाय-बाय म्हटले होते. पण जेव्हा तुम्ही कलाकार होता, तेव्हा कलाकारच राहता. मी कधीही योजनाबद्ध जीवन जगले नाही. तसेच मी अभिनेत्री बनू इच्छित नव्हती. मी तर आर्किटेक्‍ट किंवा ऐस्ट्रोनॉट बनू इच्छित होती. पण आता तो सर्व इतिहास आहे.

दरम्यान, “सडक-2’मध्ये पूजा भट्ट आणि संजय दत्त हे एका वयोवृद्ध दाम्पत्यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर पूजाची छोटी बहिण आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे डायरेक्‍शन पूजाचे वडिल महेश भट्ट हे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)