प्रदूषण आणि डायबेटीस (भाग १) 

डॉ. गौरी दामले 
आज डायबेटीस हा साथीच्या रोगाप्रमाणे सर्वदूर प्रसार झालेला प्रमुख विकार म्हणून परिचित आहे. आपल्या आधीच्या पिढीत हा आजार इतक्‍या मोठ्या प्रमाणात दिसत नव्हता. चुकीची जीवनशैली, वाढते शहरीकरण अशा अनेक कारणांप्रमाणे झपाट्याने वाढलेले प्रदूषण हा मधुमेह वाढीसाठी महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे आढळून आले आहे. म्हणूनच आज हा विषय पाहू या. 
पर्सिस्टंट ऑरगॅनिक पोल्यूटंटस्‌ pops हे प्रदूषण करणारे घटक शरीराच्या सतत संपर्कात आले तर टाईप 2 व टाईप 1 मधुमेह, पोटाच्या चरबीची वाढ, हृदयविकार, रक्‍तातील साखर यात वाढ होत असल्याचे दिसून येते. मानव निर्मित pops कीटकनाशके, इतर घटक दूषित अन्न विशेषत: मास, मासे, दुग्धजन्य पदार्थ यामुळे pops शरीराच्या संपर्कात जास्त येतात. शरीरात जितकी जाडी, मेद, चरबी जास्त तितके शरीरात शोषल्या जाणाऱ्या pops चे प्रमाण अधिक असते. जन्माच्या वेळची परिस्थिती, आहार, स्तनपान याचाही शरीरावर प्रदूषणाचा काय परिणाम होणार pops level लेव्हल किती राहणार यावर फरक पडतो. स्थूलत्व तंबाखू या नेहमीच्या रिस्क फॅक्‍टस बरोबरच हल्लीच्या काळात डायबेटिस, हृदयरोग व इतर लाईफस्टाईल आजार वाढवणारे नवे रिस्क फॅक्‍टर्सही उदयाला आले आहेत ते असे-
1मानसिक व भावनिक ताण
2सांस्कृतिक व सामाजिक, आर्थिक बदल
3शरीरात दीर्घकाळ मुरलेले चिवट इन्फेक्‍शन
4वातावरणातील प्रदूषण
5दाटीवाटीची लोकसंख्या वस्ती
पर्सिस्टंट ऑरगॅनिक पोल्यूटंटस्‌ शरीरात जाण्याचे मार्ग: 
1 हवेचे प्रदूषण
2 व्यावसायिक ठिकाणचे प्रदूषण
3 वातावरणाचे इतर प्रदूषण
4 विविध वायूंचा संपर्क 5pop,pm2 & pm10 शी थेट संपर्क
ट्रॅफिक तंबाखूचा धूर नायट्रोजन डायऑक्‍साईड व मानवनिर्मित 2, 3, 7, 8 टेट्राक्‍लोरो डायबेंझो पी डिऑक्‍सिन अशा अनेक घातक पदार्थांचा परिणाम शरीरावर होत असतो. हवेची शुद्धता तपासण्याच्या अमेरिकन मापनानुसार 15mg/m3 हवा व डब्ल्यूएचओच्या मापदंडानुसार 10 mg/m3 हवा यापेक्षा कमी प्रदूषण 2.5 mg mass pops झाले असेल तर चालू शकते.
या मापदंडानुसार सर्वात प्रदूषित देश खालीलप्रमाणे- 
1. मंगोलिया 2. बोटस्वाना 3. पाकिस्तान 4. सेनेगल 5. सौदी अरेबिया 6. इजिप्त 7. यू ए ई नायजेरिया 9. इराण 10. कुवेत 11. बांगला देश 12. बोस्निया 13. भारत 14. नेपाळ 15. चीन 16. घाना सर्वात प्रदूषित देशांच्या या चाचण्या कॅनडा, जर्मनी, अमेरिका, डेन्मार्क, इराण, तैवान, या देशांतर्फे करण्यात आल्या. प्रदूषणाचा त्रास कोणत्या व्यक्‍तीला होईल, हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. प्रदूषणातील विष कोणते, प्रदूषण कोठून झाले, किती वेळा किती वेळ प्रदूषणात गेला, स्त्री/पुरुष स्थूल स्त्रियांना जास्त त्रास होतो या सर्व घटकांवर अपाय अवलंबून असतो.
प्रदूषणामुळे नेमके काय घडते? 
pm2..5चे प्रमाण 60+ 5 mg/m3 पेक्षा जास्त असेल तर ह प्रदूषण आणि अन्नातील वाढते मेदघटक हे एकत्रितपणे खूप त्रास देतात. अशा रुग्णांमध्ये/ व्यक्‍तींमध्ये फास्टिंग व पी.पी. शुगर, इन्शुलिन लेव्हल, इन्शुलिन अवरोध हे सर्वच वाढलेले आढळतात. त्याचबरोबर रक्‍तवाहिन्या खराब करणारे TNF, IL6 लेफ्टिन, रेइस्टिन असेही घटक वाढतात. शरीरातील प्रदूषणाने उठझ फायब्रिनोजेन पाय वन असे घटक वाढतात व रक्‍तवाहिन्यांचा दाह होतो. या सर्व घटकांचा लिव्हर व शुद्ध रक्‍तवाहिन्या महारोहिणी यावर वाईट परिणाम होतो.pm 2.5 पेक्षा कमी आकाराच्या प्रदूषणामुळेही वाईट परिणाम होतात. या प्रदूषणात हवेत असलेल्या विषारी वायूंचा घटकांचा फार मोठा वाटा असतो ते असे-
नायट्रोजन ऑक्‍साईड- वाहनांचे प्रदूषण, इलेक्‍ट्रॉनिक पॉवर प्लॅट, नैसर्गिक वायूंचे ज्वलन, कोळसा, डिझेल तेल यांचे ज्वलन तसेच सिगारेटचा धूर, लाकडाचे ज्वलन यामुळे हे प्रदूषण होते.
हायड्रोजन सल्फाईड H2S – पेट्रोलचे कारखान्यातील टाकाऊ गोष्टी, मल:निसारण प्रक्रिया केंद्र, प्रदूषित पाणी प्रक्रिया करणारी केंद्रे, पेपर फॅक्‍टरीचे काम, खतांचे कारखाने इथेहे प्रदूषण होते.
कार्बन मोनॉक्‍सॉईड- वाहने, स्टोव्ह, गॅस, इंजिन्स, फायरप्लेस, ग्रिल्स, फरनेस, कंदील, वॉटर हिटर्स, गॅस ड्रायर्स अशा ठिकाणी हे प्रदूषण होते.
अमोनिया ब्लिचिंग प्रॉडक्‍टस्‌, फरशीसाठी स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे साहित्य, टॉयलेट क्‍लिनर्स, लॉंड्रीतील डिटर्जंट, प्लंबिग क्‍लिनर्स, ओव्हन स्वच्छ करण्यासाठी चमक आणण्यासाठी वापरण्यात येणारे मेण, कीटकनाशके, केसाचे रंग यातून हे प्रदूषण होते.
कार्बन डायऑक्‍साईड CO2- गॅसोलिन, नैसर्गिक वायू ज्वलन यामुळे हे प्रदूषण होते.
हायड्रोजन फ्लूरॉईड HF- रिफायनरी, कोळशाचे ज्वलन ग्लास इचिंग प्लॅंट, इनॅमल इचिंग, सिलीकॉन चिप प्लॅंट, गंज काढण्याची केमिकल, पितळ्याला चमक आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी यातून हे प्रदूषण होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)